रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती. Read More
विश्वचषक फुटबॉल महासंग्रमात जवळपास 736 खेळाडूंचा सहभाग असणार आहे. या खेळाडूंमध्ये 53 असे खेळाडू आहेत, की त्यांच्या नावावर विश्वचषकात एक तरी गोल केल्याची नोंद आहे. ...
फुटबॉलमध्ये प्रत्येक संघात किमान एक ‘स्टार’ खेळाडू असतो. त्या स्टार खेळाडूभोवती पूर्ण संघ असतो. हा स्टार खेळाडू ढेपाळला की संघच नांगी टाकतो, असे चित्र अनेकदा दिसून आले आहे ...
दोन दिवसांनंतर फुटबॉलच्या सर्वांत प्रतिष्ठेच्या जेतेपदासाठी जगातील ३२ संघांदरम्यान चुरस अनुभवायला मिळणार आहे. एकाच वेळी विविध स्टार खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळणार असल्याने फुटबॉलविश्वाची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे. ...
प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये संघर्ष करणाऱ्या स्पेनच्या सुवर्णमय पिढीतील उर्वरित स्टार खेळाडू कदाचित आपल्या अखेरच्या विश्वकप स्पर्धेत छाप सोडण्याच्या निर्धाराने सहभागी होतील. ...
विश्वकप स्पर्धेत स्टार खेळाडू लुई सुआरेजवर नियंत्रण राखावे लागेल, याला उरुग्वे संघाने प्राधान्य दिले आहे. इटलीचा डिफेंडर जॉर्जियो चिलिनीला चावा घेतल्यामुळे सुआरेजला २०१४ च्या विश्वकप स्पर्धेतून बाहेर करण्यात आले होते. ...
गुरुवारपासून सुरू होत असलेल्या विश्वचषक फुटबॉल महासंग्रामाकडे सर्व जगाचे लक्ष लागले असून, त्याच वेळी यंदाच्या स्पर्धेत कोणता ‘स्टार खेळाडू’ आपले वर्चस्व प्रस्थापित करणार, याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...