केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या ट्विटमधील फोटो अक्षय कुमारने आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. तसेच, शेतकरी हा देशाचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत, ते दिसूनही येतंय. ...
ट्रॅक्टर दूर्घटनेनंतर दिल्ली पोलिसांकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला होता. यात, आयटीओजवळील पोलीस बॅरिकेड तोडण्याच्या प्रयत्नात वेगात असलेले एक ट्रॅक्टर उलटल्याचे दिसत आहे. याच ट्रॅक्टरखाली नवरीत सिंग यांचा दबून मृत्यू झाला. ...
सचिन तेंडुलकरने ट्विट करत, भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याची भूमिका घेऊ शकतात. मात्र, हस्तक्षेप करू शकत नाही. भारतीयांना भारत माहिती आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा ...