धावांचे लक्ष्य देण्यात इंग्लंड माहीर आहे, पण धावांचा पाठलाग करताना येणाऱ्या दबावाचा सामना करण्यात इंग्लंड संघ अपयशी ठरत आहे. त्यामुळे सध्या यजमान संघ दबावात असल्याचे स्पष्ट आहे. ...
गेल्या लढतीत श्रीलंकेविरुद्ध पराभव स्वीकारणारा इंग्लंड संघ आपल्या चुकांपासून बोध घेत परंपरागत प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारी साखळी फेरीत खेळणार आहे. ...
क्रीडा वर्तुळात वर्षभराचा कालावधी प्रदीर्घ असतो. आता ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरी गाठण्यापासून एक पाऊल दूर आहे. जर ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवला तर हा विजय इंग्लंड संघाला अडचणीत आणू शकतो. ...
विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला गेलेला यजमान इंग्लंडच्या मार्गात आता अडथळे निर्माण झाले. लंकेकडून पराभूत झालेल्या या संघाला अव्वल चारमध्ये स्थान मिळविण्यासाठी आता बलाढ्य तीन संघांसोबत चढाओढ करावी लागेल. ...
कारण इंग्लंडची आता गाठ पडणार आहे ती पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाबरोबर. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडच्या संघाने थेट तेंडुलकरला नेट्समध्ये प्रॅक्टीस द्यायला बोलावले आहे. ...