मुंबईत सध्या महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी एका मुलाखतीत निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेना वेगळे लढणार का? याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ...
गेल्या दोन-अडीच वर्षांत पालिकेवर प्रशासक असल्यामुळे विरोधकांना सत्ताधाऱ्यांविषयी बोलण्यात मर्यादा येतील. सत्ताधारी वेळप्रसंगी प्रशासनावर ढकलून मोकळे होतील. त्यामुळे या निवडणुकीचा अजेंडा सगळ्यात आधी कोण सेट करणार? त्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतील. ...
केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने महायुतीतील तिन्ही पक्ष, त्यांचे स्थानिक नेते, कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून जाण्याची महत्त्वाकांक्षा अधिक असणे साहजिक. ...