भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Maharashtra Election 2019: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यात 288 मतदारसंघात 1 हजार 504 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असून एकूण 3 हजार 239 उमेदवार निवडणूक रिेंगणात आहेत. ...
Maharashtra Election 2019: मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने येत्या २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीकरिता नामनिर्देश पत्रे सादर करण्यास दि. २७ सप्टेंबर २०१९ रोजी सुरुवात झाली होती. ...
भोकरदन, परतूर आणि बदनापूर विधानसभा मतदार संघात अत्यंत सरळ पध्दतीने उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. तर जालना, घनसावंगी मतदार संघात मात्र रात्री ९ वाजेपर्यंत आक्षेपांबाबत निर्णय लांबल्याने उमेदवारांच्या ह्रदयाचे ठोके चुकले होते. ...
म्हैसूर शाई तयार करणारी ही कंपनी कर्नाटक सरकारच्या अंतर्गत कार्यरत असून भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी शाईचा पुरवठा करण्याचे एकमेव कंत्राट याच कंपनीला दिले आहे. ...
शिर्डी विधानसभा 2019: राधाकृष्ण विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना नोटरी करून दिलेल्या प्रमाणपत्रावरच काँग्रेसने आक्षेप घेत अर्ज रद्द करण्याची मागणी केली होती. ...