सर्वत्र पावसाने दडी मारल्याने सरासरीच्या ४० टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. यासाठी शासनाने नुकताच ट्रिगर-टू लागू करीत राज्यातील ४३ तालुके दुष्काळी ठरविले आहेत. ...
मोठ्या प्रमाणावर झळ बसलेले ४० तालुके अंतिम करण्यात आले असून, या तालुक्यांत येत्या दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याची घोषणा होण्याची शक्यता आहे. ...
दुष्काळ जाहीर करण्यासाठी पहिला निकष लागू होत असला तरी त्यासंदर्भात आता कृषी विभागाने १५ जिल्ह्यांमधील ४२ तालुक्यांमध्ये पिकांची व आर्द्रतेची स्थिती पडताळणीचे काम हाती घेतले आहे. याचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केल्यानंतर दुष्काळाची तीव्रता तपासून त्या ...