बेंगळुरू येथे काही तासांसाठी धावपट्टी बंद करण्यात आल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी ६ वाजता बेंगळुरूला जाणाऱ्या गो एअरच्या जी-८ ८११ विमानाने आठ तास उशिरा अर्थात दुपारी १.४५ वाजता उड्डाण भरले. ...
नागपूरहून थेट गोवा, जयपूरकरिता नवीन उड्डाणासाठी इंडिगो एअरलाईन्सने नागरी उड्डायण संचालनालयाकडे (डीजीसीए) प्रस्ताव पाठविला आहे. याशिवाय मुंबईकरिता नागपुरातून पाचवे नवीन उड्डाणाच्या संचालनासाठी कंपनीने प्राधिकरणाकडे प्रस्ताव ठेवला आहे. ...
उड्डाणासाठी तयार असलेले इंडिगो एअरलाईन्सचे ६ई ४०३ नागपूर-कोलकाता विमान बुधवारी सायंकाळी तांत्रिक बिघाडामुळे विमानतळावर थांबविण्यात आले. विमान उड्डाणासाठी तयार होते. इंजिनही सुरू झाले होते. जवळपास ३.३० तास विलंबानंतर प्रवाशांना इंडिगोच्या दुसऱ्या विमा ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शारजाह आणि दोहा येथून नागपुरात येणारी विमाने पहाटे अनुक्रमे ४.१० आणि ४.२५ वाजता येतात. या विमानातून येणाऱ्या प्रवाशांना तपासणीच्या नावाखाली त्रास होत आहे. अनेक तासांचा प्रवास करून नागपुरात आल्यानंतर कस्ट ...
अक्षयतृतीयाच्या दिवशी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर अरेबियाच्या विमानातून आलेल्या दोन व्यक्तींजवळून २५.३ लाख रुपयाचे सोने पकडण्यात आले. यासोबतच या दोघांना मुंबईच्या विमानाचे तिकीट उपलब्ध करण्यासाठी आलेल्या नागपुरातील एका ...
फोनी वादळ पश्चिम बंगालमध्ये धडकल्यामुळे कोलकाता आणि हल्दिया विमानतळ शुक्रवारी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कोलकाता येथून नागपूरला येणारी इंडिगो एअरलाईन्सची दोन विमाने रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी एअर इंडियाच्या प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. एअरलाईन्सची विमाने चार ते सात तास उशिरा पोहोचली. चेक इन सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यामुळे कंपनीच्या देशभरातील उड्डाणांवर परिणाम झाला. अन ...