धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते. Read More
संभाजीराजे छत्रपतींना शिवसेनेच्या मतांचा पाठिंबा न मिळाल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली व त्याचे खापर शिवसेनेवर फोडले. दुसरीकडे शिवसेनेने भाजपाची चाल उलथवून लावल्याचा दावा केला आहे. ...
विकासकामांचे नारळ फोडताना कोणी दडपशाही करायला लागला, गुंडगिरी करायला लागला, तर मला बोलवा. पाच मिनिटांत येथे येतो. बंटी पाटलांचे दांडके अजून घट्ट आहे, असा इशाराही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिला. ...
विरोधातील उमेदवाराला शेवटच्या दोन दिवसांतील जोडण्या करण्यात अडचणी निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा फंडा अठरा वर्षांनंतर या निवडणुकीत पुन्हा यशस्वी झाला. ...
माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ गुरूवारी येथील ताराराणी चौकात सर्व पक्षीय महिलांनी निदर्शने केली. काळ्या साडया परिधान करून त्यांनी निदर्शने केली. यावेळी महिलांनी एक रूपयांचा कडीपत्ता, मुन्ना झालेे बे ...
काँग्रेसच्या उमेदवार महिला आहेत त्यामुळे महिलेला मते द्या, असे ते सांगतील. परंतु जे काम तुमचा प्लंबर असलेला, इलेक्ट्रिशियन असलेला नवरा करतो ते तुम्हाला जमणार आहे का, ज्याचे काम त्यानेच करायचे असते अशी टिप्पणी केल्याने वाद. ...
महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्थापन झाली असताना शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडून महाराष्ट्रात राजकीय टोळीयुध्द सुरु असल्याची टिकाही यावेळी राजू शेट्टी यांनी केली. ...