धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते. Read More
संभाजीराजे छत्रपतींना शिवसेनेच्या मतांचा पाठिंबा न मिळाल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली व त्याचे खापर शिवसेनेवर फोडले. दुसरीकडे शिवसेनेने भाजपाची चाल उलथवून लावल्याचा दावा केला आहे. ...
विकासकामांचे नारळ फोडताना कोणी दडपशाही करायला लागला, गुंडगिरी करायला लागला, तर मला बोलवा. पाच मिनिटांत येथे येतो. बंटी पाटलांचे दांडके अजून घट्ट आहे, असा इशाराही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिला. ...
विरोधातील उमेदवाराला शेवटच्या दोन दिवसांतील जोडण्या करण्यात अडचणी निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा फंडा अठरा वर्षांनंतर या निवडणुकीत पुन्हा यशस्वी झाला. ...