दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. Read More
कर्णधारपदावरून पायउतार झाल्यावर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात न खेळण्याचा निर्णय गंभीरचाच होता, पण तो का? या प्रश्नाचे उत्तर माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिले आहे. ...
कर्णधारपद गमावल्यावर गौतम गंभीरला दिल्ली डेअर डेव्हिल्सच्या संघातूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. श्रेयस अय्यरने कर्णधारपद स्वीकारल्यावर गंभीरचा काटा काढला, असा कयासही काही जणांनी लावला. ...
श्रेयसने एक षटकार खेचला आणि तो चेंडू सीमारेषेबाहेर डगआऊटमध्ये बसलेल्या गंभीरच्या समोरच पडला. त्यावेळी गंभीर आणि अन्य खेळाडूंची प्रतिक्रीया ही पाहण्यासारखी होती. ...
दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कर्णधारपद गौतम गंभीरकडून श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आले आणि पराभवाच्या दुष्काळात सापडलेला दिल्लीचा संघ विजयाच्या मार्गावर परतला. ...
क्रिकेटबद्दल अत्यंत गंभीर असणाऱ्या आणि कोलकात्याला आयपीएलचं जेतेपदही मिळवून देणाऱ्या गौतम गंभीरनं दिल्ली डेअरडेविल्सचं कर्णधारपद तडकाफडकी सोडल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. ...