दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. Read More
आयपीएलच्या 2020साठीची लिलाव प्रक्रिया 19 डिसेंबरला कोलकाता येथे पार पडणार आहे. पण, तत्पूर्वी सहभागी संघ खेळाडूंची अदलाबदल करत आहेत आणि काल मुंबई इंडियन्सच्या जाळ्यात महत्त्वाचा खेळाडू लागला आहे. ...