दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. Read More
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL) सातत्याने निराशाजनक कामगिरी करणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने नशीब बदलण्यासाठी नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे आयपीएलमधील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले आहे. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत मुंबईला दिल्लीकडून 11 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मुंबईचे प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न भंगले आहे. ...
तळाला असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सवर विजय मिळवून अव्वल स्थानावर विराजमान व्हायचे, असे स्वप्न चेन्नई सुपर किंग्जचा संघ पाहत होता. पण दिल्लीच्या युवा सेनेने त्यांचा 34 धावांनी पराभूत केले आणि चेन्नईचे अव्वल स्थानाचे स्वप्न भंगले. ...
आयपीएलच्या गुणतालिकेत पुन्हा एकदा तळाच्या स्थानावर राहण्याच्या स्थितीत असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला शुक्रवारी ‘प्ले आॅफ’साठी पात्र ठरलेल्या चेन्नई सुपरकिंग्सवर विजय नोंदविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागेल. ...
अफगाणिस्तान, इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी माझी निवड करण्यात आली नाही. त्यामुळे माझ्या रागाचा पारा चढला आणि हाच निवड समितीवरचा राग मी माझ्या खेळीद्वारे व्यक्त केला, असे पंतने म्हटले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. ...