बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
जितके जास्त फॉलोअर्स, तितकी जास्त लोकप्रियता... अशात सोशल मीडियावर स्वत:चा दबदबा निर्माण करण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी फेक फॉलोअर्स खरेदी केल्याचे उघड झाले आहे. यात बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या अनेक सेलिब्रिटींची नावे आहेत, यावर एक नजर... ...
स्टार प्रभास लवकरच अभिनेत्री दीपिका पादुकोनसोबत नाग अश्विनच्या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात दीपिकाची अधिकृत एन्ट्री झाल्यावर सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे. ...