बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
सध्या दीपिका पादुकोण दिल्लीमध्ये छपाक सिनेमाचे शूटिंग करतेय. दिल्लीत सध्या सूर्य आग ओकतोय त्यामुळे शूटिंग दरम्यान दीपिकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. ...
लोकसभा निवडणुकीला नुकतीच सुरूवात झाली असून सगळीकडे निवडणूकीचे वारे वाहताना दिसत आहेत. त्यात बॉलिवूडचे काही कलाकार दरवर्षीप्रमाणे यंदाही मतदान करू शकणार नाहीत. ...
छपाक या चित्रपटातील दीपिकाच्या लूकची चांगलीच चर्चा सध्या रंगली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, दीपिकाला रोज या व्यक्तिरेखेसाठी मेकअप करण्यासाठी अनेक तास आरशाच्या समोर बसावे लागते. ...
अभिनेत्री दीपिका पादुकोण व अभिनेता रणवीर सिंग गेल्या वर्षी लग्नबेडीत अडकले. त्यांच्या लग्नानंतर दीपिका प्रेग्नेंट असल्याची चर्चा सगळीकडे होऊ लागली. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत दीपिकाने प्रेग्नेंसीबाबत खुलासा केला आहे. ...
वय वाढल्यानंतर आपल्या स्वभावातही तेवढाच बदल होत असतो हे तेवढेच खरे आहे. या स्वभावाचे उग्र रुप तेव्हा दिसते जेव्हा आपल्याला कोणी या वयात काका किंवा काकू म्हणून संबोधतो. विशेषत: एखाद्या सेलेब्रिटीला हे शब्द वापरले तर ते आणखीच जास्त चिडतात. आज आपण अशाच ...