बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सलमान खान व आलिया भटला घेऊन ‘इंशाअल्लाह’ हा चित्रपट बनवणार होते. पण मध्येच भन्साळींनी हा चित्रपट न बनवण्याचा निर्णय घेतला. आता ‘इंशाअल्लाह’ पाठोपाठ आणखी एक चित्रपट रखडण्याची चिन्हे आहेत. ...
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी गतवर्षी नोव्हेंबरमध्ये लग्नगाठ बांधली. दीपवीरच्या या लग्नाची कधी नव्हे इतकी चर्चा झाली. आता चर्चा होतेय ती दीपिकाच्या प्रेग्नंसीची. ...
दीपिका पादुकोण अनेकदा डिप्रेशनवर बोलली. अलीकडे एका ताज्या मुलाखतीतही ती यावर बोलली होती. पण दीपिकाच्या या मुलाखतीवर अभिनेत्री कंगना राणौतची बहीण रंगोली इतकी भडकली की, दीपिका व रणबीर यांच्या नात्याबद्दल ती नको ते बोलून गेली. ...