राज्यात दुष्काळ जाहीर केलेल्या ४० तालुक्यांतील पशुधन वाचविण्यासाठी तातडीने चारा डेपो सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे चारा डेपो ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहतील. ...
पशुधनामध्ये विविध रोगाच्या प्रतिबंधाकरिता लसीकरण करण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने लाळ खुरकूत, पीपीआर, घटसर्प, फऱ्या व लम्पी त्वचारोग या आर्थिक दृष्ट्या महत्वाच्या आजारांचा समावेश होतो. ...
Amul Dairy 'अमूल'ने म्हैस दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत आता 'अमूल'चे दूध ७२ रुपये लिटरने मिळणार आहे. ...
दक्षिणेकडील राज्यांतील दूध उत्पादनात वाढ झाल्याने देशांतर्गत बाजारपेठेत गाय बटर व पावडरच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे राज्यातील खासगी दूध संघांनी शनिवारपासून गाय दूध खरेदी दरात एक ते दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
दूध उत्पादकांना स्वावलंबी बनविणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ) मधील सत्तांतरानंतरचे तिसरे वर्ष हे हीरकमहोत्सव वर्ष असून, ते संकल्पपूर्तीचे आणि दूध उत्पादकांचे उत्कर्ष करणारे ठरले आहे. ...
दूध व्यवसायासमोरील अडचणीमध्ये वाढ होत आहे. शासनस्तरावरून केले जाणारे तात्पुरते प्रयत्न तोकडे पडत आहेत. घटते दूध उत्पादन, वाढत जाणारा उत्पादन खर्च, अल्प दर आणि खासगी दूध संस्थांकडून होणारी पिळवणूक यामुळे दूध उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. ...