भाकड जनावरांची खरेदी-विक्री बंद झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचले आहेत. त्यातच जर्सी गाईच्या नर वासरांना (अंतुले) सोडून देण्याच्या प्रकारामुळे भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले असून, पशुपालकांचे लाखोंचे नुकसान होत आहे. ...
Success Story : तंत्रशुद्ध पद्धतीने पपईची शेती केल्यास अडीच एकरात महिन्याला ५० ते ६० हजारांची कमाई होते. हे इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेल्या व शेतीत नवनवे प्रयोग करणाऱ्या रूपेश बाळकृष्ण टांगले यांनी स्वअनुभवातून दाखवून दिले आहे. ...
सध्या राज्यातील विविध भागांमध्ये मका पीक मुरघासासाठी योग्य अवस्थेत असून अनेक शेतकरी या पिकास थेट मुरघासासाठी देण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. (Maize crop status in Maharashtra 2025) ...
Agriculture Market Update : सणासुदीचे दिवस असल्याने सध्या बाजारात गिऱ्हाईकी चांगली असून, सरकी ढेप व नारळाच्या भावाने उच्चांक गाठला आहे. त्याचबरोबर खाद्यतेलातही तेजी आली आहे. सोन्या-चांदीने मंदीतून पुन्हा तेजीकडे वाटचाल केली आहे. ...
राज्य शासनाने 'पदुम' विभागाची (पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य) पुनर्रचना करत पशुसंवर्धन विभागाकडे वर्ग केला असून आता 'पदुम'चे कोल्हापूर जिल्हा पातळीवरील लेखापरीक्षण (दुग्ध) ची कार्यालये बंद केली आहे. ...