Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. Read More
Mumbai News: दहीहंडीला महिलांना पाहून अश्लील टिप्पणी करण्याबरोबरच, पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, फुगे उडविणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे. साध्या गणवेशातील पोलिसांचा सर्व घडामोडींवर वॉच असणार आहे. ...
Kalyan Dahi Handi: -छत्रपती शिवाजी चौकात दहिहंडी साजरी करण्याची परवानगी ठाकरे गटाला नाकारण्यात आली आहे. पोलिसांनी शिंदे गटाला परवानगी दिली आहे. पोलिस आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विरोधात ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...
ऑगस्ट महिन्यात येणारा दहीहंडी उत्सव हा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आला आहे. त्यामुळे गोविंदा पथकांना सराव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. ...
गोकुळष्टमीच्या दिवशी उंच थरांच्या दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई, ठाण्यात गोविंदा पथके महिनाभर सराव करत असतात. या पूर्वतयारीची रंगीत तालीम म्हणून चोर दहिहंडीकडे पहिले जाते. ...