अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग नावाचे चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईलाही हानी पोहचेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...
बुधवारी हे चक्रीवादळ दमण, हरिहरेश्वर आणि अलिबागला ओलांडेल. यावेळी ताशी १२० किमी वेगाने वारे वाहतील. चक्रीवादळामुळे ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. ...
निसर्ग चक्रीवादळाच्या वादळाची सद्यस्थिती पाहता आयएमडीने म्हटलं आहे की, पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये तयार झालेला दाबाचा पट्टा मुंबईच्या ५५० किमी, पणजीच्या ३०० किमी, सुरतच्या ७७० किमी दूर आहे ...
रत्नागिरी तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावरील गावांना निसर्ग चक्रीवादळामुळे सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांचे पथक तालुक्यातील किनारपट्टीवरील गावांमध्ये दाखल झाले आहेत. या पथकाकडून गावांची पाहणी करण्यात येत आहे. ...