अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. Read More
सध्याच्या कमी दाबाच्या पट्ट्याचे वादळात आणि पुढे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा धोका आहे. मात्र या बदलांमुळे महाराष्ट्रात मुंबईसह किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी विशेषत: ३ व ४ जून रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...