पीकविमा योजनेच्या निकषांनुसार पावसात २१ दिवसांपेक्षा जास्त घट असल्यास व उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आल्यास शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईपैकी २५ टक्के आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे. ...
नॅनो खतांची फवारणी केल्यानंतर नत्र व स्फुरद झाडाच्या पानावरील, बिया व मुळाच्या पृष्ठभागावर असणाऱ्या छिद्रांच्या माध्यमातून आतमध्ये प्रवेश करते व पानांच्या पेशीमधील पोकळीमध्ये साठवले जाऊन पिकांच्या आवश्यकतेनुसार झाडाला उपलब्ध होते. ...
सरकारने नाफेडमार्फत २,४१० रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या खरेदीच्या अटी शर्तीबाबत शेतकऱ्यांत रोष असताना आता नाफेडने कांद्याचे दर तब्बल १३६ रुपयांनी घटविल्याने बळीराजाच्या असंतोषात आणखीनच भर पडली आहे. ...
साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक झाली. यावेळी २५ किमी हवाई अंतराची अट रद्द करण्याचा ठराव मंजूर करून तो मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. ...
संत्राच्या आंबिया बहराची गळती सुरू असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. तीन वेगवेगळ्या कारणांमुळे ही गळ होत असल्याचा निष्कर्ष कृषी विद्यापीठ, अकोला येथील कृषी शास्त्रज्ञांनी काढला आहे. ...
देशात कापसाच्या डीएनए चाचणीला प्रोत्साहन देण्यासाठी कापूस मार्कर विकसित करण्याचा प्रकल्प, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद-राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था (सीएसआयआर-एनबीआरआय) यांच्या सहकार्याने सुरू केला जाईल, यावर गोयल यांनी प्रकाश टाकला. ...