या कापसात २५ ते ४५ टक्क्यांपर्यंत ओलावा आहे. ओलावा असलेल्या कापसाचे जिनिंगच होत नाही. हा कापूस सडतो. त्यातून सुतही निघत नाही. यामुळे खरेदी झालेला कापूस व्यापाऱ्यांनी जिनिंगमध्ये वाळू घातला आहे. यातून जिनमध्ये पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिलेली नाही. ...
दरवर्षी शेतकऱ्यांचा दिवाळीत १५ ते २० क्विंटल कापूस घरी येतो. परंतु यावर्षी मात्र शितदहीपलीकडे अद्याप कापसाचा वेचा सुरू झाला नाही. परतीच्या पाऊस, ढगाळ वातावरण, रोगराई याचा थेट परिणाम कापूस उत्पादनावर होणार आहे. आर्वी तालुक्यातील वाठोडा, वागदरा, शिरपूर ...
पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापसाचे पीक महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. नगदी पीक म्हणून गणल्या जाणाऱ्या या पांढऱ्या सोन्याचे यंदा परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले. उत्पादनही घटले आहे. त्यामुळे यंदा कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत ...
कापसाचा पेरा व वाढलेले उत्पादन, टेक्सटाईल उद्योगातील मंदी, बाजारात कापसाचे पडलेले भाव यामुळे यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय खरेदीवरच अवलंबून रहावे लागण्याची चिन्हे आहेत. ...