९७६ पैकी फक्त ७० शेतकऱ्यांच्या कापसाची मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 03:41 PM2020-05-23T15:41:09+5:302020-05-23T15:42:12+5:30

मतीन शेख मुक्ताईनगर , जि.जळगाव : तालुक्यातील ९७६ शेतकºयांनी शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. यापैकी ...

Out of 976, only 70 farmers counted cotton | ९७६ पैकी फक्त ७० शेतकऱ्यांच्या कापसाची मोजणी

९७६ पैकी फक्त ७० शेतकऱ्यांच्या कापसाची मोजणी

googlenewsNext
ठळक मुद्देमुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना जावे लागते बोदवड केंद्रावरसंथ गतीने होतेय मोजणी

मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील ९७६ शेतकºयांनी शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. यापैकी फक्त ७० शेतकºयांचा कापूस आतापर्यंत मोजला गेला आहे. विशेष म्हणजे बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सीसीआय कापूस खरेदी बाजार समितीच्या मुक्ताईनगर उपबाजारात केली जाणे अपेक्षित असताना मुक्ताईनगरच्या शेतकºयांंना बोदवड कापूस खरेदी केंद्रावर जाऊन कापूस मोजणी करावा लागत आहे.
व्यापाºयांचा कापूस शेतकºयांच्या नावावर
बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत बोदवड तालुका, मुक्ताईनगर आणि वरणगाव उपबाजार येतात. या ठिकाणी एकूण ३ हजार ४०९ शेतकºयांनी कापूस विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी काही व्यापाºयांनी शेतकºयांच्या नावावर कापूस विक्री करीत असल्याच्या तक्रारी करीत आहे. परिणामी बाजार समितीच्यावतीने कापूस विक्रीबाबत नोंदणी केलेल्या शेतकºयांची यादीच जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक तहसीलदार यांच्याकडे पाठवून शेतकरी व व्यापाºयांचे पडताळणी व्हावी याबाबत मागणी केली आहे. जेणेकरून पूर्णपणे फक्त शेतकºयांचा कापूस याठिकाणी सीसीआयमार्फत खरेदी केला जाईल. याबाबतचा पत्रव्यवहार बाजार समितीच्या वतीने करण्यात आला आहे.
व्यापाºयांची धडपड
सीसीआय कापूस दर व खासगी बाजारपेठेतील कापूस दरात जवळपास ८०० ते १ हजार रुपये प्रतिक्विंटल दराची तफावत आहे. यामुळे खासगी व्यापाºयांनी काही शेतकºयांना हाताशी करून त्यांच्या नावावर सीसीआयकडे कापूस विक्री करून नफा कमविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. हा गोंधळ मोडीत काढून व्यापाºयांना चपराक देत खºया शेतकºयांचा कापूस प्राधान्याने मोजला जावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे.
संथ गतीने होतेय मोजणी
तब्बल साडेतीन हजार शेतकºयांची कापूस विक्रीसाठी नोंदणी झाली आहे. अगदी मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकºयांनादेखील बोदवड येथील खरेदी केंद्रावर जाऊन कापूस मोजावा लागत आहे. अशात दिवसाला ३५ ते ४० वाहने मोजली जात आहेत. मान्सूनच्या पावसाला अवघे १५ दिवस उरले आहेत. ओढून ताणून खरेदी २० दिवस चालेल, असे जाणकार सांगतात. अशात नोंदणी केलेल्या सर्व शेतकºयांचा कापूस मोजला जाईल काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. मोजणीची गती वाढविणे गरजेचे असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.


बाजार समितीकडे तीन हजार ४०९ शेतकºयांनी कापूस विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी काही व्यापाºयांनी शेतकºयांच्या नावावर कापूस विक्री करीत असल्याची तक्रार शेतकरी करीत आहे. अशात शेतकरी कोण आणि व्यापारी कापूस कोणाच्या नावावर मोजला जाईल याबाबत पडताळणी संबंधित पोलीस पाटील व तलाठी करावी. जेणेकरून फक्त खºया शेतकºयांचा कापूस मोजला जाईल. तसा पत्रव्यवहार प्रशासनाकडे व पालकमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे.
-निवृत्ती भिका पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार, समिती, बोदवड

Web Title: Out of 976, only 70 farmers counted cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.