ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More