नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. Read More
शहरात सर्वत्र ख्रिसमसचा उत्साह असून, प्रभू येशूच्या जन्मदिनाच्या आनंदात शहर बुडाले आहे. चर्चसोबतच चौकाचौकात आणि घरांवरही रोषणाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी प्रतिकृती तयार करून प्रभू येशूच्या जन्मप्रसंग दर्शविण्यात आला आहे. ...
खासकरुन देशी-विदेशी पर्यटकांना टार्गेट करुन आयोजित करण्यात येणाऱ्या या पार्ट्यांना पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या क्लृप्त्या आयोजकांनी अवलंबवल्या आहेत. ...
नाताळनिमित्त कोल्हापूरातील सर्वात जुने चर्च सजले आहे. नाताळच्या पूर्वसंध्येला सायंकाळी प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे तर उद्या नाताळनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
येशू ख्रिस्ताचा जन्म अर्थात ख्रिसमस सणासाठी पुण्यतील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. सर्वत्र चैतन्याचे वातावरण असून शहरातील विविध चर्चमधील तयारी सुद्दा आता अंतिम टप्प्यात आली आहे. ...