छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
छगन भुजबळांकडून जाहीरपणे फटकेबाजी केली जात असल्याने त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय, विधानसभा निवडणुकीपूर्वी ते वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत की काय, याबाबतही आता तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. ...
loksabha Election - ४ जूनच्या निकालानंतर अनेक नेते कोलांट्याउड्या मारतील असं सत्ताधारी आणि विरोधकांकडून बोललं जात आहे. त्यातच नाशिक येथे काँग्रेस आमदाराने भुजबळांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. ...
जितेंद्र आव्हाडांकडून महाडच्या चवदार तळ्याजवळ आंदोलन करताना बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडण्यात आला. यामुळे त्यांच्यावर चहुबाजूने टीकेची झोड उठली. त्यातच मंत्री भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली आहे. ...
BJP Sudhir Mungantiwar News: लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन महायुतीतील नेते दावे प्रतिदावे करताना दिसत आहेत. ...