राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
Chhagan Bhujbal : सुप्रीम कोर्टाने नुकत्याच ९२ नगरपरिषदांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याबाबत एक निर्णय दिला आहे. या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज केली आहे. ...
शिवसेना एकत्र असली पाहिजे, राहिली पाहिजे, गावगावातल्या शिवसैनिकांचे काय? शिवसेना संपावी असे कोणत्याही मराठी माणसाला वाटणार नाही. शिवसैनिकाच्या रक्तात सेना आहे, त्यामुळे तो सेनेपासून दूर जाऊ शकत नाही, असे छगन भुजबळ म्हणाले. ...
शिवसेना संपावी असे कोणत्याही मराठी माणसाला वाटणार नाही. पण एकमेकांवर कटू प्रहार करू नयेत, अशी अपेक्षा छगन भुजबळ यांनी एकनाथ शिंदे बंडावर व्यक्त केली. ...