Navi Mumbai: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे-भाजप यांचे सरकार येताच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या स्वप्नातील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने वेग पकडला आहे. ...
...यामुळे हा मार्ग ज्या जमिनीतून जाणार आहे, अशी ३२४ एकर २९ गुंठे वन जमीन शिंदे सरकारने आता एनएचएसआरसीएल अर्थात नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशनकडे गुरुवारी सुपूर्द केली आहे. ...
या बांधकामात या मार्गावरील महाराष्ट्रातील ठाणे, विरार आणि बोईसर या तीन उन्नत स्थानकांचाही समावेश आहे. यामुळे येत्या चार वर्षे दोन महिन्यांत राज्यातील ही तिन्ही स्थानके आकार घेणार आहेत. ...