कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५०० किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा जाणार आहे. Read More
देशातील संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे. याविरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून भारत जोडो यात्रेत आम्ही एकत्र आलो आहोत, अशी भूमिका युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली. ...
Bharat Jodo Yatra, Kanhaiya Kumar: शेतमालाला भाव मिळत नाही, उच्च शिक्षण घेऊनही नोकरी लागत नाही अशी तरुणांची अवस्था आहे मात्र अमित शाह यांच्या मुलाला मात्र नोकरी लागते तेही नियम बदलून याचा संताप तरुणांमध्ये आहे ...