पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने बेंबळाच्या पाण्याकडे नजरा लागून असलेल्या यवतमाळकरांच्या पदरी यंदाच्या उन्हाळ्यातसुद्धा निराशाच पडली आहे. बेंबळावरून स्वतंत्र पाईपलाईन टाकून यवतमाळकरांंची तहान भागविण्याच्या कामाची संथगती कायम आहे. ...
जिल्ह्यातील पाणी टंचाई तीव्र होत आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. त्यानुसार बेंबळा व कुंभारकिन्ही धरणातील पाणी नदीत सोडण्यात आले. ...
नऊ महिन्यात केवळ पाच किलोमीटर पाईप टाकले. आणखी तेरा किलोमीटर बाकी आहे. कंपनीचे पाईप थांबून थांबून येत आहे. टाकणारेही थंड आहे. फिल्टर प्लान्टचे काम केवळ ५५ टक्के झाले. शिवाय लाईन मार्गातील शेतात पिके आहेत. ...
रविवारपासून सुरू झालेला संततधार पाऊस गुरूवारी पाचव्याही दिवशी सुरूच असून त्यामुळे पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीतील पाण्याची पातळी वेगाने वाढण्याची शक्यता आहे. ...
संततधार पावसामुळे बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले असून प्रती सेकंद ४८० घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान शहरानजीकच्या नदीला पूर आल्याने काठावरील चार कुटुंबाना नगरपंचायतीने उर्दू शाळेत हलविले आहे. ...
जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायाला चालना देण्यासाठी २०१२ मध्ये नियोजन समितीने दोन मत्स्यबीज निर्मिती केंद्रासाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. अनेक अडथळ््यांमुळे या केंद्राचे काम रखडले होते. ...
बेंबळा प्रकल्पातील पाणी यवतमाळात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असून, येथील टाकळी सम्प आणि जॅकवेल जवळच्या पंपहाऊसला विद्युत पुरवठ्याचे काम पूर्ण झाले आहे. येथील मशनरी लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे. ...
अमृत योजनेअंतर्गत यवतमाळ शहरासाठी बेंबळा प्रकल्पाचे पाणी आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. पाणी टंचाईच्या काळात याच प्रकल्पाची यवतमाळकरांना आशा आहे. ...