हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
हे वृत्त पसरताच हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी निदर्शने, आंदोलने सुरू झाली. परप्रांतीयांची हॉटेल्स, दुकाने, तसेच अन्यत्रही दगडफेक सुरू झाली. तिथेही लाठीमार झाला. गोळीबार करण्यात आला. तब्बल ८ दिवस मुंबईत जाळपोळ सुरू राहिली. ...
बाळासाहेबांच्या आवाहनातून प्रेरणा घेत अशोक वैद्य यांनी बटाटावडा आणि पोहे यांचा स्टॉल टाकला. तोवर उडपी आणि दाक्षिणात्य पदार्थांची रस्त्यावर विक्री होत असे. ...