दुसरा मानांकित भारतीय बॅडमिंटनपटू बी. साईप्रणित आणि चौथा मानांकित समीर वर्मा यांनी आश्वासक सुरुवात करीत बुधवारी सुरू झालेल्या आॅस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. ...
युवा प्रतिभावान बॅडमिंटनपटू वैष्णवी भाले हिने नागपूरच्या क्रीडाविश्वात मानाचा तुरा रोवला आहे. विश्व बॅडमिंटन महासंघाद्वारे (बीडब्ल्यूएफ) आयोजित प्रतिष्ठेच्या थॉमस आणि उबेर चषक स्पर्धेसाठी वैष्णवीची भारतीय महिला बॅडमिंटन संघात निवड झाली. ...
फुलराणी सायना नेहवाल आणि आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू या सर्वात यशस्वी शिष्या आपल्यासाठी अनमोल रत्न असल्याचे भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य कोच पुलेला गोपीचंद याने म्हटले आहे. ...
बी. साईप्रणित याने पुरुष एकेरीत न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. स्पर्धेत आव्हान टिकविणारा तो एकमेव भारतीय खेळाडू ठरला. तिसरा मानांकित प्रणितने श्रीलंकेचा तिलुका करुणारत्ने याला २६ मिनिटांत २१-७, २१-९ असे पराभूत केले. ...
दुसरीकडे रियो आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाºया पी. व्हि. सिंधूने आपल्या नावाला साजेसा खेळ करीत चीनी तैपईच्या पाइ यू पोला २१-१४, २१-१९ गुणांनी नमवित दुसºया फेरीतील आपली जागा निश्चित केली. ...
महाराष्ट्र शासन, आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ व भारतीय शालेय खेळ महासंघाच्या वतीने आयोजित जागतिक शालेय बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या गटात भारत ‘अ’ संघाने शुक्रवारी ब्राझीलवर मात करून विजयी सलामी दिली. ...