नवाबपुरा रोडवर शेख रऊफ यांनी ‘अपना’हे इलेक्ट्रिक दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी व्यापाऱ्यांकडून लाखो रुपयांचा उधारीवर मालही आणला. त्यांचे दुकान आणि गोदाम शुक्रवारी मध्यरात्री जळून खाक झाले. ...
दंगलखोरांना वठणीवर आणण्यासाठी शहर पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी अश्रुधुराचे शेकडो नळकांडे फोडले. त्यानंतरही दंगेखोर नियंत्रणात न आल्याने पोलिसांनी दहा तासांत तब्बल २६१ प्लास्टिक गोळ्या त्यांच्यावर झाडल्या, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. ...
जुन्या शहरातील दंगलग्रस्त भागात अजूनही अनेक दुकानांमधील आग विझलेली नाही. राखेच्या खाली आग अजूनही जळत असताना रविवारी दुपारी अडीच वाजता एमआयएम नेते राजाबाजार भागात शंभरहून अधिक तरुणांसह दाखल झाले. त्यांनी ज्या दुकानांचे नुकसान झाले त्यांची पाहणी केली. ...
दंगलीत दोषी कोण हे न बघता त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एका पत्रकार परिषदेत रविवारी दिले. ...
दंगलप्रकरणी २४ जणांना अटक करून रविवारी (दि.१३) न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना गुरुवारपर्यंत (दि.१७) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.वाय.एच. मोहंमद यांनी दिले. ...
हातगाड्या, फेरीवाले या मुद्यांवरून सिटीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न दोन गटांकडून करण्यात येत होता. या दोन्ही गटांवर कायदेशीर कारवाई करण्याचे धाडस सिटीचौक पोलिसांनी दाखविले नाही. ...