आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
Asia Cup 2018: भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये आज आशिया चषक स्पर्धेत महामुकाबला होणार आहे. आशिया स्पर्धेत हे शेजारी 11 वेळा समोरासमोर आले आहेत आणि दोघांनी प्रत्येकी 5-5 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णीत राहिला. ...
Asia Cup 2018 #INDvHKG: शिखर धवन आणि अंबाती रायुडू यांच्या दमदार खेळीनंतरही भारताला आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्या लढतीत हाँगकाँगविरुद्ध मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ...
Asia Cup 2018: भारताच्या सलामीवर शिखर धवनने आशिया चषक स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत हाँगकाँगविरुद्ध शतकी खेळी केली. वन डे कारकिर्दीतील त्याचे हे 14वे शतक ठरले. ...
इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरलेल्या भारताचा सलामीवीर शिखर धवनने आशिया चषक स्पर्धेत सकारात्मक सुरूवात केली. दुबळ्या हाँगकाँगविरुद्ध त्याने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावले. ...
आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. बुधवारी या दोन उभय संघांमध्ये रंगणारे महासंग्रामाची प्रत्येक क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहे. ...