अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे. Read More
Ashwini Mahangade : अभिनेत्री अश्विनी महांगडे ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. ...
Ashwini Mahangade : अश्विनी महांगडेने सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केले आहे आणि त्यामागची एक गोष्ट सांगितली आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. ...