आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
BJP Ashish Shelar Slams Thackeray Government : हिंदू नववर्षाच्या निमित्ताने गुढीपाडव्याला निघणाऱ्या शोभायात्रा आणि राम नवमीच्या मिरवणूका यांना परवानगी द्या, अशी मागणी आशिष शेलार यांनी विधानसभेत केली होती. ...
‘निधी देण्याबाबत मी शांतपणे त्या अधिकाऱ्यास समजावून सांगतो अन् नाहीच ऐकले तर सक्तीच्या रजेवर पाठवतो. तसेच सरकारच्या वतीने निधीही दिला जाईल’, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला आश्वस्त केले. ...
विविध विभागाच्या मागण्यांवर चर्चा करीत असताना शेलार यांनी गावठाण, कोळीवाड्याच्या प्रश्नांसोबत मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका, मुंबईतील खेळाच्या मैदानांचे भाडेपट्टे आदी विषयांकडे सरकारचे लक्ष वेधले. ...