आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
महाविकास आघाडीचे सरकार कोसळताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीला फटकारले ते पाहता त्यांचेही टार्गेट नक्की आहे. भाजपने त्यांना टाळी दिलेला हात अजून सोडलेला नाही. ...
Ashish Shelar : मुंबई प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर ते आज दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. ...
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपामध्ये खांदेपालट करण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागताच भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. ...