आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
आमच्या हिंदु सणांवर महाविकास आघाडी सरकार काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना निर्बंध घातले गेले. मंदिरे बंद झाली, गणपतीच्या मुर्तीवर मर्यादा आली. परंतु आज सरकार बदललं असं सांगत शेलारांनी शिंदे-फडणवीसांचे आभार मानले. ...
गेली ३ वर्ष गोविंदा पथकांना दहिहंडीच्या उत्साहाला मुकावं लागलं. हिंदु सणांवर बंदी लावण्याचं काम मागील सरकारने केले असा टोला शेलारांनी महाविकास आघाडीला लगावला. ...
वरळी नाक्यावर भाजपाची पारंपारिक हंडी लावण्याचं काम आमदार सुनील राणे करत होते. मग त्यांना हायजॅक करून जांबोरी मैदानावर हंडी लावलीय का? असा सवाल सचिन अहिर यांनी शेलारांना विचारला आहे. ...