Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती. Read More
जीएसटीमुळे हैराण झालेले छोटे व्यापारी, ज्वेलर्स आणि निर्यातकांना सरकारने शुक्रवारी मोठा दिलासा दिला आहे. दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गावर सवलतींचा वर्षाव करण्यात आला आहे. ...
देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर सडकून टीका करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली आहे ...
‘जीएसटी’ने त्रस्त व्यापारी, महागाई व मंदावलेली अर्थव्यवस्था यांमुळे सर्वसामान्याचा संतापाचा पारा चढत असताना तसेच विरोधी पक्षांच्या टीकेसोबतच स्वपक्षीयांमधील अस्वस्थता वाढत असताना काही तातडीने करण्याची निकड सरकारला जाणवली आहे. ...
अनेक दुकानांमध्ये ‘आज रोख, उद्या उधार’ फलक पाहायला मिळतात. त्याच धर्तीवर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज महागाईची तयारी ठेवा, उद्या कदाचित स्वस्ताई येईल, असे सूचित केले आहे. ...
माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी देशात राबवण्यात येत असलेल्या आर्थिक धोरणांवरून मोदी सरकारवर जोरदार टीका करत घरचा आहेर दिला होता. त्यानंतर आता भाजपाच्या अजून एका ज्येष्ठ नेत्याने मोदींवर टीकास्र सोडले आहे. ...