Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती. Read More
केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले असते. करांची रचना काय होईल, येत्या वर्षामध्ये कोणत्या सुविधा, योजना मिळतील आणि कोणती उत्पादने स्वस्त होणार याची माहिती घेण्यासाठी नागरिक प्रयत्नशिल असतात. ...
अर्थसंकल्पाबाबत अनेक विशेष घटना किंवा वैशिष्ट्ये आपल्याला माहिती असतात. बजेट मांडण्यापूर्वी खुद्द अर्थमंत्री एका कढईतून अर्थमंत्रालयातील कर्मचाऱ्यांना हलवा वाटत आहेत, असे छायाचित्र प्रसिद्ध होतात. ...
भारताची निम्मी लोकसंख्या 35 वर्षांखालची आहे. या तरुणाईला खुश करण्यासाठी सरकारला बजेटमध्ये काही विशेष तरतुदी कराव्याच लागणार आहेत. कारण त्यावरच पुढची बरीच गणितं अवलंबून आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार २०१९च्या निवडणुकांपूर्वी अखेरच्या पूर्ण अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रामुख्याने टॅक्समध्ये दिलासा देण्याचा विचार होऊ शकतो. ...
आगामी अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता बारीक लक्ष घातले आहे. अर्थसंकल्पाच्या पूर्वतयारीसाठी नरेंद्र मोदी हे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, तसेच पंतप्रधान कार्यालय, अर्थखात्याच्या अधिका-यांसह रोज ...