Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती. Read More
पंजाब नॅशनल बॅक मधील हजारो कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी यांचे आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या कुटुंबियांचे लागेबांधे आहेत. आणि त्याला भारतातून पळून जायला अरूण जेटली यांनीच मदत केली. ...
पीएनबीमधील हजारो कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याचे आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कुटुंबीयांचे लागेबांधे आहेत आणि त्याला भारतातून पळून जायला अरुण जेटली यांनीच मदत केली ...
रुपया मातीमोल झाला आणि तेलाचे भाव आकाशाला भिडले. अनेक धनवंत हजारो कोटींचा पैसा लंपास करून, हा देश सोडून पळाले आहेत आणि देशाचे अर्थमंत्री मात्र राहुल गांधींना शिवीगाळ करून आपला टीकेचा सूर बदलू पाहात आहेत. ...
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत गांधी कुटुंबाचा रायबरेली हा बालेकिल्ला मिळविण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली खासदाराला असलेला मतदारसंघ विकासनिधी वापरणार आहेत. ...
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये काही प्रमाणात कपात केल्यानंतर आता केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. ...