Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती. Read More
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणामुळे रोजगारांत कोणत्याही प्रकारे कपात होणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे. लोकसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात जेटली यांनी ही माहिती दिली. ...
काँग्रेसने राफेल करारावरून केलेले आरोप लोकसभेमध्ये परतवून लावणाऱ्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कौतुक केले आहे ...
राष्ट्रीय कंपनी कायदा लवादामुळे (एनसीएलटी) ६६ प्रकरणांत ८0 हजार कोटी रुपयांजे कर्ज वसूल झाले आहे. आणखी ७0 हजार कोटी रुपयांचे कर्ज मार्च अखेरपर्यंत वसूल होईल, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली. ...
येत्या 10 जानेवारीला वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या (जीएसटी परिषद) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये निर्माणाधीन इमारती आणि बांधकाम पूर्ण होऊन भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) न मिळालेल्या इमारतींमधील फ्लॅटवरील जीएसटी दर घटवून पाच टक्क्यांवर आणण्याचा ...