लोहशिंगवे येथील शेतकरी सुरेश दत्तू जुंद्रे यांच्या शेतवस्तीवर असलेल्या गोठ्यात जाऊन बिबट्याने एका वासरावर हल्ला चढवला असून, या हल्ल्यात वासरू ठार झाल्याची घटना घडली. सदर बिबट्या गेल्या अनेक दिवसांपासून येथील शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत होता. ...
जोगलटेंभी येथे शनिवारी (दि.२३) रात्री बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बिबट्या जखमी झाला आहे. ...
वेळ रात्री साडेनऊ वाजेची... ठिकाण : शिंदे पळसे शिवार... येथील एका उसाच्या शेतात जवळ वनविभागाने लावलेल्या पिंजºयात शनिवारी रात्री बिबट्या अडकतो. डरकाळ्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक पिंजºयाच्या दिशेने धाव घेतात आणि एकच गर्दी जमते. कोणी बॅटरी पिंजºयावर ...
‘अत्यावश्यक सेवा किराणा माल, शेती औजारे व भाजीपाला’ असा फलक वाहनाच्या पुढच्या काचेच्या बाजूला लावून जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या चालकाला वणी पोलिसांनी अटक केली असून, लॉकडाउनच्या काळात संधिसाधूंचा फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ...
राजापूर परिसरात उन्हाचा तडाखा सोसत मेंढपाळ आपल्या मेंढ्यांच्या चारा-पाण्यासाठी भटकंती करत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन व संचारबंदी लागू झाल्याने त्याचा फटका मेंढपाळांनाही बसला आहे. ...
कळवण येथील पश्चिम भागात लॉकडाउनमुळे रस्ते सुनसान पडले आहेत. या शांततेचा फायदा उठवत बिबट्यांनी अन्न पाण्यासाठी आपला मोर्चा नागरी वस्त्यांकडे वळविल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. वनविभागाने त्वरीत पिंजरे लावून सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली ...