आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
संजय दत्तच्या बायोपिक 'संजू'ने अभिनेता रणबीर कपूर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यास मदत केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. संजूने बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड तयार केले आहेत. ...
रणबीर आणि आलियाचा बल्गेरियातील एक फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ते दोघे पबमध्ये दिसत असून रणबीरने आलियाच्या खांद्यावर हात ठेवला आहे. या फोटोत त्या दोघांची केमिस्ट्री त्यांच्या फॅन्सनाही दिसून येत आहे. ...
सिद्धार्थ मल्होत्राने 'स्टुडंट ऑफ द ईअर'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर आलिया भट्टसोबत त्याचे नाव जोडण्यात आले. सिद्धार्थ आणि आलिया एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सतत कानावर आल्या. ...
संजय दत्त प्रमाणेच संजू या चित्रपटात संजयची भूमिका साकारणाऱ्या रणबीरचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले आहे. रणबीर सध्या आलिया भट सोबत नात्यात आहे. ...