अवैध गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी नगर जिल्हाधिका-यांनी पकडलेल्या व दंड न भरलेल्या वाहनांचा महसूल शाखेकडून लिलाव होणार आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशाने ही कारवाई होत आहे. ...
नगर जिल्ह्यातील आठ लाख शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणारे धान्य १ मार्चपासून आॅनलाईन पीओएस मशीनव्दारे मिळणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १ हजार ८८० दुकानात पीओएस मशीन बसविण्यात आले आहे. ...
अहमदनगर जिल्हा सकल तेली समाजातर्फे तेलीखुंट ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात विविध सामाजिक संघटनांनीही सहभाग घेतला. ...
शासनाने ९ फेब्रुवारी २०१८ रोजी सर्व विभागाच्या कंत्राटी कर्मचा-यांना शासकीय सेवेत सामावून न घेण्याचा व त्यांच्या पुनर्नियुक्तीच्या शर्ती व अटींचा जी. आर. काढल्यामुळे राज्यातील तीन लाख कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली. ...
शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्या व विविध प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जोरदार निदर्शने करण्यात आली. ...
महाराष्ट्राचे जलयुक्त शिवारचे काम सर्वोत्तम असून हीच योजना देशात लागू करण्याची गरज आहे. नद्याजोड प्रकल्पामुळे राज्याराज्यात भांडणे लागतील, त्यामुळे हा प्रकल्प देशासाठी धोकादायक आहे, अशी भीती जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केली. ...
अहमदनगर : जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत केलेली कपात शासनाने सोमवारी उठली असून, जिल्ह्याला ३० टक्क्यांप्रमाणे ८५ कोटींचा निधी मिळणार आहे. तसा आदेश जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला. ...
मुजोर झालेल्या वाळूमाफियांना वठणीवर आणण्यासाठी शासनाने एमपीडीए कायदा लागू केला आहे. त्याची धडक अंमलबजावणी करा. जिल्हा प्रशासनाने या कायद्याचा प्रभावी वापर केला तर महसूल कर्मचा-यांना हात लावायची कोणाची हिंमत होणार नाही ...