शासकीय रोपांवर अवलंबून न राहता स्वत:च्या घरावरच रोपवाटिका तयार करून शाळा, महाविद्यालयांना मोफत रोपे देण्याचा उपक्रम पारनेर येथील वृक्षमित्र व शिक्षक लतिफ राजे यांनी केला आहे. ...
शहरातील चांदणी चौकातून युनियन बँकेचे अकरा लाख रुपये लुटारूंनी लांबविले. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत कँप पोलीस अधिक चौकशी करत आहेत. ...
मृत बिबट्याच्या अवयवांची लाखो रूपयांना विक्री करणाऱ्या टोळीला सापळा रचून वेषांतर करीत खरेदीदार बनून भंडारदरावाडी (ता. इगतपुरी जि. नाशिक) येथील वन खात्याच्या कर्मचा-यांनी अकोले तालुक्यातील एका आरोपीसह इगतपुरी तालुक्यातील चार जणांना अटक केली. ...
हिंदू नववर्ष व साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला नगर जिल्ह्यात गृहखरेदीचा कल वाढला आहे. गेल्या दोन वर्षांच्या मंदीनंतर रिअल इस्टेटमध्ये हळूहळू चैतन्य येत असून, यंदा मध्यमवर्गीयांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. ...
पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील ४८ गावांना पंधरा दिवसांपासून मळीसदृश रसायन मिश्रीत पाण्याचा पुरवठा होत असल्याने शेवगाव, पाथर्डी तालुका सध्या अनेक आजारांच्या विळख्यात आहे. अनेकजण पोटाच्या आजाराने त्रस्त आहेत. ...
दूषित पाणीप्रश्नी भाकप व रिपाइं (आठवले) गट, शिवसेना, मनसे, काँंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, टायगर फोर्स व विविध संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्यावतीने शुक्रवारी सकाळी शेवगाव नगर परिषद कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. ...
भापकरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी पक्षांना उन्हाळ्यात अन्न, पाणी पुरवठा करण्यासाठी ‘जगा आणि जगू द्या’ असा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. शाळेत ठिकठिकाणी पक्षांसाठी धान्य व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ...