अहमदनगर येथील ११ व्या प्रतिबिंब चित्रपट महोत्सवामध्ये राष्ट्रीय लघुपट व माहितीपट स्पर्धेमध्ये विद्यार्थी गटात रोहतक (हरियाणा) येथील विजय कुमार यांच्या ‘पारो’ या लघुपटाने प्रथम क्रमांक पटकावला. ...
तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात १७ हजार ५३५ रुपये किंमतीच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ...
बुधवारपासून जिल्ह्यात सुरू होणा-या बारावी परीक्षेसासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांत ९३ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, जिल्ह्यातील ६४ हजार ३४६ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. ...
गेल्या दोन महिन्यांपासून कोतूळ व ब्राह्मणवाड्यात एकाच दिवशी चो-या होत आहेत. शनिवारी रात्री दोनच्या सुमारास कोतुळमध्ये भांड्याचे दुकान तर ब्राह्मणवाड्यात स्टेट बँकेच्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. ...
राष्ट्र भक्तीपासून दूर जाणारे आंतकवादाने मरतील. तसेच राम मंदिराच्या निर्मितीसाठी आपले जीवन अर्पण असून राम मंदिर होणारच. भगव्याला त्रास देणा-यांचा सर्वनाश होईल, असे प्रतिपादन साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले. ...
खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थान अतिक्रमणात असल्याची तक्रार त्यांचेच नातेवाईक विनोद अमलोक गांधी यांनी महापालिकेकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या नगररचना विभागाने मंगळवारी दुपारी निवासस्थानाची मोजणी केली. ...
भाजपाचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करणा-या बंटी राऊत याच्यासह अनोळखी चौघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कॉस्टेबल बिलाल शेख यांनी फिर्याद दाखल केली आहे. ...
कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावरील एकोणीस मैल शिवारातील बिकानेर ढाब्याच्या समोर रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. ...