तालुक्यातील रांजणगाव देशमुखसह परिसरातील धोंडेवाडी, मानेगांव, वेस, सोयगांव व बहादपूर या गावांना सध्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून गावातील उद्भव आटल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. किमान आठवड्यातून ५०० रुपये खर्च करण्याची वेळ ग्रामस्थांवर ...
केंद्र शासनाच्या अटल मिशन (अमृत) अंतर्गत शहराच्या पाणी पुरवठ्यात सुधारणा करणारी शंभर कोटीच्या पाणी योजनेचे कामही सुरू झाले असून ठेकेदाराला पहिला हप्ताही अदा करण्यात आला आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते योजनेचे उदघाटन करण्याचे सत्त ...
जिल्ह्यात वाळूचे बेकायदेशीर उत्खनन सुरु असताना अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे आणि तालुक्यांचे तहसीलदार दुर्लक्ष करत आहेत. हे अधिकारी वाळूबाबत ठोस कारवाई करत तर नाहीच, पण नदीपात्रांत पाणी असल्याचे माहिती असतानाही ठ ...
शिवसैनिकांच्या हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह तिघांना चार दिवसांच्या पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडी देण्यात आली. ...
जिल्हा मोठा असल्याने येथील प्रश्न समजावून घेऊन आणि गावपातळीवर थेट संपर्क ठेवून विकास योजना जलदगतीने मार्गी लावण्यावर आपला भर राहिल. जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आपला प्राधान्यक्रम राहिल, असा मनोदय नूतन जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यां ...
महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्यावतीने शिर्डी विमानतळांवर हवाई उड्डाण प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास आज मान्यता देण्यात आली. याशिवाय धुळे, अमरावती व कराड या विमानतळांवरही प्रशिक्षण संस्था सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यत ...
तालुक्यातील टाकळीभान येथे उसाच्या शेतात पाणी देत असताना रानडुकराने तरुण शेतक-यावर हल्ला केल्याने तरुण जखमी झाला. या परिसरात बिबट्यांची दहशत कायम असतानाच गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांचाही या परिसरात संचार वाढल्याने शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. ...