गुन्हेगारांना पाठीमागे घातले जात असेल तर शिवसेनेला कायदा हातात घ्यायचा विचार करावा लागेल. गुन्हेगारांवर कारवाई झाली नाही तर अशा नामर्दाच्या अवलादींना शिवसेना आपल्या पद्धतीने ठेचून काढेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ...
केडगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकर व रवी खोल्लम या दोघा आरोपींना मंगळवारी जिल्हा न्यायालयाने २७ एपिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
हिवरगाव पावसा येथील टोलनाका शिवसैनिकांनी सोमवारी फोडला. एम. एच. १७ या पासिंगच्या चारचाकी वाहनांना टोलमुक्ती द्यावी, यासाठी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह शिवसैनिकांनी ही टोलफोड केली. ...
व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे उद्घाटन होताच कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की शासनावर आली आहे़ बीड, उस्मानाबाद व लातूर विधानपरिषदेच्या निवडणुका जाहीर होताच संमेलन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उत्साहाने जमा झालेल्या कार्यकर्त्यांना आपापल् ...
राहाता नगर परिषदेचे नगरसेवक व नागरिकांवरील सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीकरिता शनिवारी शहरात सर्वपक्षीय मोर्चा काढून आपल्या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांना देण्यात आले. ...
कोपरगाव तालुक्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे वाभाडे निघत असताना ग्रामीण भागात अवैध धंदेही तेजीत आहे. त्यामुळे शनिवारी सरपंचांनी तातडीची ग्रामसभा बोलावून पढेगाव गावात दारुबंदीचा ठराव संमत करण्यात आला. ...
कडक पोलीस बंदोबस्तात असलेल्या राहुरी तहसील कार्यालयाच्या बंदिस्त आवारातील चक्क १० वाळूची वाहने चोरीस गेली. जप्त केलेली वाहने किती असुरक्षित आहे याची प्रचिती यानिमित्ताने आली. ...