राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालासंदर्भात तथागत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न होऊन आंदोलन करत कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली. ...
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची नगर तालुक्यातील वाळकी येथील शाखा पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी फोडली. मात्र बँकेतील सायरन वाजल्यामुळे तिजोरी लुटण्याचा प्रयत्न फसला. ...
दोन वर्षांच्या पोटच्या मुलीसह विषारी औषध पिऊन आईनं स्वत: आत्महत्या केली. मात्र विष शिल्लक न राहिल्याने सहा महिन्यांची मुलगी बचावली. ही धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे खांड गावात आज दुपारच्या सुमारास घडली. ...
सोमवारपासून तीन दिवस सलग शहरातील जागेवरच ठप्प झालेला कचरा अखेर बुधवारी रात्रीपासून उचलण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. रस्त्यात थांबलेली वाहने बुधवारी रात्रीपासूनच पोलिसांच्या बंदोबस्तात सावेडी डेपोत नेण्यात आली. ...
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेसाठी महावितरणने २०११-१२ मध्ये मंजूर केलेल्या उच्च दाबाच्या एक्सप्रेस फिडरसाठी २७ लाख ४२ हजार रूपये जिल्हा नियोजन निधीतून उपलब्ध झाल्यामुळे योजनेतील अडथळा दूर झाला आहे. ...
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेच्या श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर आज कॉपी पुरविणारांनी आज दगडफेक केली. ...
जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरती प्रक्रिया गाजत असतानाच वैद्यकीय बिलासाठी दहा टक्क्यांची मागणी केल्याचा धक्कायदाक प्रकार समोर आला आहे. आधीच आजाराने बेजार संबंधित रुग्णाने विधान परिषद अध्यक्षांकडे टक्केवारीसाठी नगर जिल्हा परिषदेत अडकलेले बिल काढून देण्या ...
नगर शहरातील माळीवाडा परिसरात मारुती कुरिअर फर्ममध्ये मंगळवारी रात्री झालेल्या क्रूड बॉम्बस्फोटाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. ...